चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली दहावीचा निकाल ९५.५५ टक्के

चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली दहावीचा निकाल ९५.५५ टक्के

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयाचा इयत्ता १० वीचा निकाल ९५.५५% लागला असून इयत्ता १० च्या परीक्षेसाठी एकूण ४५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कुमारी पद्मश्री प्रसन्न वैद्य हिने ८८.८० % गुण मिळवून आबलोली विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कुमारी गार्गी उल्हास काळे हिने ८६.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर कुमारी अनुष्का शिवाजी भोसले हिने ८६.००% गुण मिळवून तसेच कुमार साईराज शेखर अलीम याने ८६.००% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेसाठी
एकूण ४५ विद्यार्थी बसले होते पैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चंद्रकांत बाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयाचा इयत्ता १० वी चा निकाल ९५.५५% लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक धनाजी गिरी, लोक शिक्षण मंडळ आबलोली या मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतशेठ बाईत, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिनशेठ बाईत आणि संचालक मंडळाच्या सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें