मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार – उपसभापती निलेश सुर्वे

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील मासू बुद्रुक येथील घाणातले टेप ते भाटलवाडी या रस्त्याचे उद्घाटन शनिवार दिनांक १० मे २०२६ रोजी पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतर्गत हा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे.

सदर रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जागा गेल्या त्या शेतकऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी रस्ता पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमात बोलताना उपसभापती निलेश सुर्वे यांनी श्री गणेश नृत्य कला पथक भाटलवाडी यांना संबोधित करताना, नव्याने झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच मासू गावाच्या विकासासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत विविध विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वाडीचे प्रमुख कार्यकर्ते अंकुश आलीम यांनी रस्त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हे काम शक्य झाल्याचे नमूद केले.

या उद्घाटन सोहळ्यास पंचायत समिती सदस्या सौ. स्नेहा शिगवण, भाजपा सरचिटणीस सचिन ओक, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष विजय मसुरकर, शेखर आलीम, महादेव आलीम, उपसरपंच सौ. उज्वला नाचरे, सदस्या शर्मिला आलीम, श्री गणेश नृत्य कला पथक भाटलवाडीचे अध्यक्ष गंगाराम आलीम, मुंबई अध्यक्ष महेश आलीम, वाडी प्रमुख कार्यकर्ते अंकुश आलीम, शैलेश आलीम, अंकुश बारस्कर, प्रमोद आलीम आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]