स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)             

माझी रत्नागिरी जिल्हा बांधकाम आणि आरोग्य सभापती स्व. वसंत (बाळासाहेब) खेतले साहेबांची पाचवी पुण्यतिथी पार पडली. पुण्यतिथी दिनानिमित्त स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य), माधवबाग चिपळूण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री. भास्करशेठ जाधव साहेब, मा. तांडले साहेब, वेळणेश्वर गटाच्या विभागप्रमुख मा. सौ. सिद्धीताई रामगडे, मा. डॉ. सौरभ सुर्वे आणि टीम, कुटगिरी गावचे मा. पोलीस पाटील श्री. सुधाकर खेतले, मा. तंटामुक्ती अध्यक्ष आयु. विजय कदम, चिपळूण रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री. दिलिप खेतले,मा. सैनिक हेमंत खेतले, गोर गरिबांचे कैवारी मा. श्री.भाई सपकाळ सर,पाभरे गावचे समाजसेवक मा. श्री. काशिराम पाष्टे, श्री. विजय घडशी, प्रतिष्ठानचे जेष्ठ सल्लागार श्री. दत्ताराम डिंगणकर, श्री. अर्जुन आगरे, मा. PSI प्रकाश खेतले सर, पाभरे गावचे समाजसेवक श्री. अशोक बागकर, तंटामुक्ती अध्यक्षा सौ. जोस्त्ना कातळकर,कुटगिरी गावचे अध्यक्ष श्री.मनोहरजी खेतले, गावठण तरुण विकास मंडळ वाडी अध्यक्ष श्री. मंगेश खेतले, श्री. शंभर मारुती खेतले,श्री. विनय कातळकर, श्री. सिताराम खेतले, माजी उपसरपंच श्री.सुरेशजी खेतले, विठोबा नाना खेतले, ह.भ.प.सुभाष महाराज जाधव, कुटगिरी गावचे शाखा प्रमुख श्री. अरविंद खेतले, श्री.चारुदत्त सावंत, श्री.संतोष खाकम, श्री. चंद्रकांत खाकम, श्री. महादेव खाकम, श्री काशिराम डिंगणकर उपस्थित होते. या शिबिरामध्ये वैद्यकीय तपासणी, नाडी परीक्षण, आहार व व्यायाम विषयक सल्ला, रँडम ब्लड शुगर, SPO2, बॉडी मास इंडेक्स (BMI), निशुल्क ECG तपासणी, फुफुसाची कार्यक्षमता तपासणी इ. तपासण्या करण्यात आल्या. १५० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्या सर्व लोकांचे आम्ही आभारी आहोत.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नंतर प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. श्री. प्रदीप तुकाराम खेतले साहेबांना महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड २०२६ जाहीर झाल्यामुळे मा. श्री. आमदार भास्करशेठ जाधव साहेब यांनी त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. विशेष आभार मा. श्री. डॉ. यतीन जाधव यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप खेतले, अमोल खेतले,सुरज हुमणे, ओम वीर, मंदार हुमणे, शिशिर खेतले, गणेश जाधव, रोहित सावंत,लक्ष खाकम, दुर्वेश खाकम, कुणाल खाकम खुप मेहनत घेतली. शेवटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप खेतले साहेबांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें