सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

१७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि उमंग ॲपवरही निकाल उपलब्ध

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज, १३ मे रोजी दुपारी जाहीर केला. यंदा बारावीचा एकूण निकाल ८५.२० टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत निकालात ३.१९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या तारखेबाबत विविध अफवा पसरत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर मंडळाने अधिकृतपणे निकाल जाहीर केला आहे.

भारतासह जगातील २७ देशांमध्ये सीबीएसईशी संलग्न शाळा कार्यरत आहेत. मंडळाशी संलग्न असलेल्या १९ हजार ९६७ शाळांमधून यंदा १७ लाख ८० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १७ लाख ६८ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधून १५ लाख ७ हजार १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाची बारावीची परीक्षा जगभरातील ७ हजार ५७३ केंद्रांवर घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी एकूण १२० विषय उपलब्ध करून देण्यात आले होते.

निकाल कुठे पाहता येणार?

विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे :

तसेच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येणार आहेत.

मोबाईल ॲपवरूनही निकाल पाहण्याची सुविधा

सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी डिजीलॉकर आणि उमंग या मोबाईल ॲपद्वारेही निकाल उपलब्ध करून दिला आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही ॲप्स उपलब्ध आहेत.

‘ऑन स्क्रीन मार्किंग’मुळे मूल्यमापन अधिक अचूक

यंदा सीबीएसईने उत्तरपत्रिका तपासणीसाठी ‘ऑन स्क्रीन मार्किंग’ प्रणालीचा वापर केला. या प्रणालीद्वारे तब्बल ९८ लाख ६६ हजार ६२२ उत्तरपत्रिकांचे डिजिटल मूल्यमापन करण्यात आले. यामुळे देशातील कोणत्याही भागातून उत्तरपत्रिका तपासणी शक्य झाली. तसेच मानवी चुका कमी झाल्याने मूल्यमापन अधिक अचूक आणि पारदर्शक झाल्याचा दावा बोर्डाने केला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]