पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या नासा, इस्रो भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी तसेच इयत्ता पाचवी नवोदय गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी पंचायत समिती गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर साहेब , पसभापती निलेश सुर्वे साहेब, जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगोडे मॅडम, पंचायत समिती सदस्य संदीप गोरीवले साहेब ,गटविकास अधिकारी परेश शिरसाठ साहेब ,गटशिक्षणाधिकारी आर एच गळवे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते त्यावेळी सभापती प्रणव, पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांचे शुभहस्ते नासा व इस्रो भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी अर्णव बामणे ,शुभ्रा भाटकर तसेच इसरो साठी निवड झालेले विद्यार्थी यश राठोड, अनय कानडे ,राहुल आंबेकर तसेच इयत्ता पाचवी नवोदय गुणवत्ता यादी निवड होऊन उल्लेखनीय यश प्राप्त करणारे विद्यार्थी , रोही जोयशी ,अभिज्ञा पवार ,अदिती साळवी ,आराध्य चव्हाण, या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .त्यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक यांना मान्यवर यांनी मार्गदर्शन केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]