NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

 

केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा तपासात खुलासा; लातूरमधील नामांकित क्लास चालकाची 11 तास चौकशी

 

लातूर : देशभर गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, तब्बल 28 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यानेच या रॅकेटचा मास्टरमाईंड असल्याचे तपासात उघड झाले आहे. लातूरमधील दयानंद महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला कुलकर्णी निवृत्तीनंतरही NEET परीक्षेशी संबंधित समितीच्या कामात सक्रिय होता.

 

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा पेपर फोडत होता, तर नाशिकमधून अटक करण्यात आलेला शुभम खैरनार आपल्या साथीदारांच्या मदतीने बायोलॉजीचा पेपर फुटवण्याचे काम करत होता. NEET परीक्षेतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय स्वतंत्रपणे टार्गेट करून आरोपी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते.

 

विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून संपूर्ण 700 गुणांचा पेपर एकाच वेळी न फोडता विषयनिहाय पेपर फुटवले जात होते. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचीही माहिती तपासातून समोर येत आहे.

 

दरम्यान, या प्रकरणात लातूरमधील एका नामांकित NEET क्लास संचालकाची सीबीआय पथकाने तब्बल 11 तास चौकशी केली. चौकशीत नेमकी काय माहिती समोर आली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या कारवाईमुळे राज्यातील खासगी NEET क्लासेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

पी. व्ही. कुलकर्णी हा लातूरच्या कैलास नगर परिसरात राहत असला तरी त्याचे कुटुंब पुण्यात वास्तव्यास आहे. निवृत्तीनंतर तो पुण्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा वाघमारे हिच्या संपर्कातून काही विद्यार्थ्यांशी त्याने संपर्क साधून पेपरफुटीचे आर्थिक व्यवहार केल्याचा संशय आहे.

 

सीबीआयकडून या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास सुरू असून आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें