रत्नागिरीत अणुऊर्जेची महास्फोटक गुंतवणूक! बारसूत अदानी, पूर्णगडात रिलायन्सचे प्रकल्प; फडणवीसांच्या उपस्थितीत करार

रत्नागिरीत अणुऊर्जेची महास्फोटक गुंतवणूक! बारसूत अदानी, पूर्णगडात रिलायन्सचे प्रकल्प; फडणवीसांच्या उपस्थितीत करार

महाराष्ट्रात अणुऊर्जा क्षेत्राला मोठी चालना; रत्नागिरी-सिंधुदुर्गात लाखो कोटींची गुंतवणूक आणि हजारो रोजगारांची संधी

मुंबई : महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. राज्य शासनाच्या ऊर्जा विभागासोबत झालेल्या या करारांमध्ये , आणि यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात स्वच्छ आणि दीर्घकालीन ऊर्जा निर्मितीस चालना देण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये लाखो कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बैठकीस पारंपारिक ऊर्जा मंत्री , ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवरचे बिझनेस हेड विवेक शर्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी व्यवसायाचे अध्यक्ष रंजय शरण उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना शासनाकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमुळे महाराष्ट्र देशाच्या ऊर्जा क्षेत्रात अग्रस्थानी राहील.”

बारसू येथे अदानी पॉवरचा ६ हजार मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प

आणि त्यांची कोस्टल-महा ॲटोमिक एनर्जी लिमिटेड यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

प्रस्तावित क्षमता : ६,००० मेगावॅट

प्रस्तावित गुंतवणूक : ₹१.५० लाख कोटी

रोजगार निर्मिती : १२ हजार (प्रत्यक्ष + अप्रत्यक्ष)

पूर्णगडात रिलायन्सचा स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर प्रकल्प

कंपनीकडून रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड येथे ‘भारत स्मॉल रिऍक्टर्स’ अर्थात SMR अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे.

प्रस्तावित क्षमता : २x२२० मेगावॅट ते ६x१२०० मेगावॅट

प्रस्तावित गुंतवणूक : ₹८ हजार कोटी ते ₹२ लाख कोटी

रोजगार निर्मिती : १.०३ लाख (प्रत्यक्ष + अप्रत्यक्ष)

देवगडमध्ये एनटीपीसीचा अणुऊर्जा प्रकल्प

मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

प्रस्तावित क्षमता : ४,००० ते ७,२०० मेगावॅट

प्रस्तावित गुंतवणूक : ₹१ लाख कोटी

रोजगार निर्मिती : ५ हजार

या प्रकल्पांमुळे कोकणातील औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें