योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती

highlits
योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती*
▪️ कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती
रत्नागिरी -(वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रभर सामाजिक, शैक्षणिक व कायदेशीर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व रत्नागिरी जिल्ह्याचे माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष, कायदेविषयक अभ्यासक श्री. योगेश तानू पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे विविध सामाजिक संघटनांकडून तसेच कायदेविषयक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध उपक्रमशील कार्यक्रमांमध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेणारे योगेश पेढांबकर यांनी गोरगरीब व अन्यायग्रस्त जनतेला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सातत्याने कार्य केले आहे. आज पर्यंत अनेक महिला निराधार महिलांना त्यांचे कुटुंब बसवण्यासाठी अतिशय विधायक कार्य त्यांनी केलेले आहे. सद्यस्थितीत ते वकिली प्राप्त करण्यासाठी शिक्षण घेत आहेत.माहिती अधिकार कायदा, लोकसेवा हक्क कायदा, दप्तर दिरंगाई कायदा तसेच विविध विधी विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास असून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकांना मोफत कायदेशीर सल्ला दिला आहे.
यासाठी त्यांनी महाराष्ट्र न्याय व पाठपुरा असे अनेक ग्रुप तयार करून लोकांना गोरगरिबांना मोफत सल्ला देत आहेत.
*रत्नागिरी जिल्ह्यात निराधार व गरजू लोकांसाठी आधारवड म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.* “न्याय व पाठपुरावा” या माध्यमातून त्यांनी सामाजिक न्याय, माहिती अधिकार आणि कायदेशीर जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवले आहे. गावपातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.म्हणूनच त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता तसेच विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
योगेश पडमकर यांनी प्रतिक्रिया देताना समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे आता परत करण्याची वेळ आहे अशी भावना व्यक्त करत अविरत कार्य चालू ठेवणार आहे असे मत व्यक्त केले.
या निवडीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

♠ रत्नागिरीवार्ताहर-डिजिटल नेटवर्क कडून  पुढील वाटचालीस शुभकामना


See less

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें