सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                                                                   दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                                                                  

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 

रत्नागिरी -डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ येथे दिनांक २१ मे २०२६ रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ साजरा करण्यात आला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभर हा दिवस पाळण्यात येतो.

यावेळी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) यांनी उपस्थितांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ ची शपथ दिली. यावेळी संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. डॉ. केतन चौधरी यांनी स्व. राजीव गांधी यांच्या कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मानवजातीला कलंक ठरलेल्या दहशतवादाचे आणि हिंसेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सदैव सतर्क आणि संघटित राहिले पाहिजे, हाच संदेश देत आज राज्यभरात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ अत्यंत गांभीर्याने पाळण्यात आला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षी २१ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. तरुणांना हिंसाचाराच्या मार्गापासून दूर ठेवणे आणि देशात शांतता, सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव रत्नागिरी येथील डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, डॉ. मनोज घुघुस्कर, सहाय्यक संशोधन अधिकारी, डॉ. हरीश धमगाये, अभिरक्षक, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी, श्रीम. वर्षा सदावर्ते, श्रीम. अपूर्वा सावंत, जीवशास्त्रज्ञ आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें