विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

highlight

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेतून परवडी कुटुंबाला आर्थिक दिलासा

राजापूर | प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील धोपेश्वर-तिठवली येथील महावितरणच्या कंत्राटी कर्मचारी अनिकेत परवडी यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या वारसांना बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेअंतर्गत 23 लाख 84 हजार 100 रुपयांचा विमा लाभ मिळाला आहे. या आर्थिक मदतीमुळे दुःखाच्या प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या परवडी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

दि. 6 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पेंडखळे येथील भवानी मंदिर परिसरात विजेच्या खांबावर काम करत असताना अनिकेत परवडी यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या अनिकेत यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

 

अनिकेत परवडी यांचे वेतन खाते बँक ऑफ इंडियाच्या राजापूर शाखेत होते. बँकेच्या खातेदार विमा संरक्षण योजनेअंतर्गत त्यांचा विमा उतरविण्यात आला असल्याने त्यांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळाला. शनिवारी ही विमा रक्कम त्यांच्या आई सुरेखा परवडी यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

 

यावेळी अनिकेत यांचे वडील शांताराम परवडी, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, महाराष्ट्र राज्य आऊटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष व साई केदार सर्व्हिसेसचे संचालक सचिन कोल्हापुरे, सॅलरी अकाऊंट विभागाचे मुकेश मेश्राम, महावितरणचे श्री. गावकारे तसेच बँक ऑफ इंडिया राजापूर शाखेचे व्यवस्थापक कन्नन बानू उपस्थित होते.

 

दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी अकाऊंटचे महत्त्व अधोरेखित करताना सचिन कोल्हापुरे यांनी महावितरणसह इतर विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्वरित सॅलरी खाते उघडून त्यामध्येच मासिक वेतन जमा करून घ्यावे, असे आवाहन केले.

 

अनिकेत परवडी यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी करण सिंग यांनी विशेष पाठपुरावा करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे विमा दाव्याची प्रक्रिया पूर्ण होऊन परवडी कुटुंबाला वेळेत आर्थिक मदत मिळू शकली.

 

कीवर्ड्स: राजापूर बातमी, अनिकेत परवडी, महावितरण कंत्राटी कर्मचारी, विजेचा धक्का मृत्यू, बँक ऑफ इंडिया विमा योजना, सॅलरी अकाऊंट विमा लाभ, राजापूर ताज्या बातम्या, कंत्राटी कर्मचारी विमा.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें