पी/दक्षिण प्रभाग समिती स्वीकृत सदस्य पदासाठी ॲड. दिपक सोनावणे यांचा अर्ज दाखल

पी/दक्षिण प्रभाग समिती स्वीकृत सदस्य पदासाठी ॲड. दिपक सोनावणे यांचा अर्ज दाखल

नवीमुंबई (मंगेश जाधव)-
तब्बल १४ वर्षांनंतर होत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग समिती स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेसाठी भाकर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. दिपक सोनावणे यांनी आज पी/दक्षिण प्रभाग समिती (गोरेगाव) येथे सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आपला अर्ज सहाय्यक आयुक्तांकडे दाखल केला. सामाजिक न्याय, कामगार हक्क, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, तृतीयपंथी हक्क तसेच वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे ॲड. सोनावणे यांच्या उमेदवारीला सामाजिक, राजकीय, कामगार, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.

यावेळी माजी आमदार कपिल पाटील, साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर देसाई, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री दिशा पिंकी शेख, समाजवादी कार्यकर्ते अरविंद सावळा, भाकर फाऊंडेशनच्या संचालिका धनश्री नाईक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते श्रीधर शेलार, वंचित बहुजन आघाडीचे गोरेगाव अध्यक्ष विवेक शिर्के, मनसे विभाग अध्यक्ष भुषण फडतरे, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच आरती बारी, माथाडी कामगार नेते अजय बारी, प्रणाली फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिकेत पडवळ, रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष समिर टाकले, पॉवर ऑफ ह्युमॅनिटीचे अध्यक्ष मुस्ताक जमाल, आविष्कार प्रतिष्ठानचे सुमित कांबळे तसेच सरीता पोटे, बजरंग बाविशे, आकाश क्षीरसागर, मयुर कांबळे, आरती डोईफोडे, सेजल बाविशे, स्वराली विरा आणि विविध सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर देसाई आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांनी सामाजिक क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्रभाग समितीत प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून प्रशासन अधिक लोकाभिमुख व उत्तरदायी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना ॲड. दिपक सोनावणे म्हणाले की, “भाकर फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविताना नागरिकांच्या असंख्य प्रश्नांशी जवळून परिचय झाला आहे. प्रभाग समितीमध्ये संधी मिळाल्यास सामाजिक संस्थांचा आवाज प्रभावीपणे प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.” प्रभाग समिती स्वीकृत सदस्य पदासाठी सामाजिक क्षेत्रातून मिळालेला हा व्यापक पाठिंबा नागरिकाभिमुख आणि सहभागात्मक प्रशासनाच्या अपेक्षांना बळ देणारा असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें