मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा यू

गुहागर – युवा कार्यक्रम एवम खेल मंत्रालय भारत सरकार संलग्न मेरा युवा भारत रत्नागिरी मार्फत व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान तालुका गुहागर व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य विभाग रत्नागिरी केंद्र गुहागर यांच्या सहयोगाने जागतिक पर्यावरण दिन अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला .त्यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील, सल्लागार माजी नगरसेवक संजय मालप साहेब ,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे तालुका समन्वयक ऍड प्रसाद जांगळी ,मुख्याध्यापिका सौ सुजाता कांबळे मॅडम ,सूर्यवंशी सर ,व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मालप यांनी केले .त्यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सौ सुजाता कांबळे मॅडम , मनोज पाटील ,प्रसाद जांगळी व सूर्यवंशी सर यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून त्यांची जोपासना करण्याचे आवाहन त्यांनी केले . त्यावेळी गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.आभार प्रदर्शन प्रसाद जांगळी यांनी केले .सदरचा कार्यक्रम मेरा युवा भारत रत्नागिरी संस्थेचे जिल्हा युवा समन्वयक श्री . सम्राट पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें