शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

शिवसेने तर्फे आबलोलीत भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विक्रांत भास्करराव जाधव यांच्या वाढदिवसाचे आणि पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकला उद्योग समूह मैदान येथे भव्य वृक्ष भेट सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत, गुहागरच्या माजी सभापती सौ. पूर्वीताई निमुणकर, विभाग प्रमुख रवींद्र आंबेकर, शाखाप्रमुख तृषांत सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पालशेतकर, वसंत सागवेकर, साळवी , उदय कदम, विशाल लोकरे, शैलेश दिंडे आदि. मान्यवर उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें