स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

■ *धारतळे कोतापूर फाटा नजीक उत्सव रिसॉर्ट मधील दुर्दैवी घटना*

■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर ( धारतळे) :- कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी गेलेल्या एका निरागस चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजापूर तालुक्यात घडली, या दुर्दैवी घटनेमुळे साखरी-नाटे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हसन सलमान कोतवडकर (वय ६ वर्षे, रा. साखरी-नाटे) हा आपल्या कुटुंबीयांसमवेत कोतापूर फाटा नजीक उत्सव रिसॉर्ट मध्ये फिरण्यासाठी गेला होता. खेळण्याच्या, बागडण्याच्या आणि निरागस हसण्याच्या वयात असलेल्या या चिमुकल्याच्या आयुष्याचा प्रवास इतक्या अकस्मात संपेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास स्विमिंग पूल परिसरात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हसन हा निरागस मुलगा पाण्यात बुडाला. काही वेळाने ही बाब लक्षात येताच उपस्थितांनी त्याला तातडीने बाहेर काढून जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले. बेशुद्ध अवस्थेत त्याला धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.काही क्षणांपूर्वी कुटुंबीयांसोबत आनंदाने वावरणारा हसन अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे समजताच कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

प्राथमिक माहितीनुसार पाण्यात बुडून गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाणे नाटेचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजापूर येथे पाठविला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण राजापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें