बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

पुरुषोत्तमपुरी येथे अतिभारामुळे अपघाताचा प्राथमिक अंदाज; सुरक्षेच्या सुविधांचा अभाव, चौकशीचे आदेश

: बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. गोदावरी नदीपात्रातून भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून आणखी काही भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे यात्रास्थळी एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी जाणारे भाविक बोटीने नदी पार करत होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त भाविक बसविण्यात आल्याने गोदावरी नदीच्या मध्यभागी बोटीचा समतोल बिघडला आणि बोट अचानक उलटली. बोटीत 50 हून अधिक भाविक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोटचालक, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. वेळीच मदत मिळाल्याने अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र या दुर्घटनेत प्रमिला राठोड या महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे.

तसेच वाशिम जिल्ह्यातील महागाव येथील सिंधुबाई मवाळ या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

भाविकांनी बोटीत लाइफ जॅकेटसह इतर सुरक्षेच्या सुविधा नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही बोटचालकांकडून वारंवार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जात असल्याचा आरोपही भाविकांनी केला आहे. सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि अतिभार हेच या दुर्घटनेमागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

पुरुषोत्तमपुरी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून अधिकमास यात्रेनिमित्त येथे दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी होत असते. यंदाही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे यात्रेच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. :::


SEO Keywords: बीड बोट दुर्घटना, पुरुषोत्तमपुरी बोट अपघात, अधिकमास यात्रा, गोदावरी नदी दुर्घटना, माजलगाव बातमी, भाविकांची बोट उलटली, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, बीड न्यूज, पुरुषोत्तमपुरी यात्रा.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें