माहीती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य फेडरेशन राजापूरची बैठक संपन्न* ■ *माहीती अधिकार १२ जून २०२६ च्या राजपत्राचा निषेध,शासनाला मूळ कायद्याच्या विसर

माहीती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य फेडरेशन राजापूरची बैठक संपन्न*

■ *माहीती अधिकार १२ जून २०२६ च्या राजपत्राचा निषेध,शासनाला मूळ कायद्याच्या विसर

■ *समिर शिरवडकर-रत्नागिरी*

राजापूर:-महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१२ जून २०२६ च्या परिपत्राचा निषेध करण्यासाठी दि. २१ जून २०२६ रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत सन्मा. अध्यक्ष बसवेकर साहेबांच्या आदेशानुसार राजापूर कार्यकारिणीची बैठक सन्मा. उपाध्यक्ष अद्वैत अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात माहिती अधिकार बाबतच्या नविन परिपत्रकावर सविस्तर चर्चा झाली आणि याबाबतीत स्थानिक आमदार आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन दि.२५ जून २०२६ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवसीय आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य सचिव समिर शिरवडकर, उपाध्यक्ष अभ्यंकर, कार्याध्यक्ष राकेश आंबेरकर, सचिव पुरुषोत्तम खांबल, सदस्य तथा नाटे सरपंच संदीप बांधकर, सचिन बांधकर, अमोल सोगम उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें