चिपळूण खेरशेतचे सुपुत्र संघराज कदम यांचे एल. एल. बी पदवी प्रथम श्रेणीत उल्लेखनीय यश संपादन

चिपळूण खेरशेतचे सुपुत्र संघराज कदम यांचे एल. एल. बी पदवी प्रथम श्रेणीत उल्लेखनीय यश संपादन

प्रतिनिधी (मंगेश जाधव) चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्मा.संजय शांताराम कदम आणि प्राथमिक शिक्षिका सन्मा.राजमुद्रा संजय कदम यांचे चिरंजीव कु.संघराज संजय कदम यांनी 19 जून 2026 रोजी ज्ञानदीप विधी महाविद्यालय बोरज-मोरवंडे, ता. खेड, जि.रत्नागिरी येथून एल.एल.बी . ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादित केलेले आहे. हा मातोश्री लक्ष्मीबाई शांताराम कदम परिवाराच्या आयुष्यातील अनमोल आनंदाचा क्षण आहे.

संघराज कदम यांनी 2009 ते 2017 मध्ये छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल,जामगे, ता.खेड, जि. रत्नागिरी येथे पाचवी ते बारावी पर्यंत सैनिकी शिक्षण पूर्ण केले आहे. देशप्रेम, शिस्त, मेहनत, चिकाटी , सातत्य व अथक परिश्रमामुळे संघराज कदम याने हे घवघवीत यश संपादन केले आहे.पुढील शिक्षण त्यांनी डी.बी.जे महाविद्यालय, चिपळूण मध्ये बी.ए.मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केलेली आहे.

या प्राप्त केलेल्या यशाबद्दल संघराज कदम यांचे जनमानसात अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें