शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम)

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते – दहिवली तालुका चिपळूण या महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रसन्न वातावरणात साजरा करण्यात आला. “निरोगी आयुष्यासाठी योग “संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर योग प्रशिक्षक प्रा.सुहास आडनाईक यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, तणावमुक्त जीवनशैली आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

 

यावेळी डाॅ.सुनितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना असे सांगितले की, योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून संतुलित आणि निरोगी जीवन जगण्याची जीवनशैली आहे. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी शरीर आणि सुदृढ मन घडवावे, असे आवाहनही प्राचार्य डॉ.सुनीतकुमार पाटील केले.

 

या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी नियमित योगाभ्यास करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

 

योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS), विद्यार्थी विकास विभाग आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें