तळवली हायस्कूलमध्ये राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी.

तळवली हायस्कूलमध्ये राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी (मंगेश जाधव )

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता गुहागर या प्रशालेत दि. 26 जून 2026 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

*प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार सर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर इतर सर्व शिक्षक वृंद यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले.*

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमावेळी इयत्ता 5 वी ते 10 च्या प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवन कार्यावर आधारित सुंदर अशी भाषणे केली. या मध्ये कु. दुर्वा टेरवकर, यश गुरव, सई आग्रे, रुद्र सैतवडेकर, मनस्वी लोंढे, साहील पिंपळकर, आरोही आंब्रे, धनश्री मोरे, गौरव चव्हाण, तनुश्री कारेकर इत्यादीनी सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. श्रीनाथ कुळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.*

*त्यानंतर जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर यांनी आपल्या व्याख्यानातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित मौलिक असे मार्गदर्शन केले. शाहु राजांच्या जीवनातील अनेक प्रसंगावर प्रकाशझोत टाकला. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व शेतीविषयक कार्ये सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर यांनी 26 जून हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून का साजरा केला जातो हे सांगितले. तसेच कोल्हापूर संस्थानात शिक्षणासाठी सोयी सुविधा कशा उपलब्ध केल्या,शाळा सुरू केल्या, वसतिगृहे स्थापन केली आणि आजही वसतिगृहे कार्यरत आहे. त्याचा परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांना फायदा होतो त्यामुळेच कोल्हापूर हे वसतिगृहाचे माहेरघर मानले जाते असे सांगून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.*

*या कार्यक्रमास प्रशालेतील जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर, सौ. नाईक मॅडम, श्री. गुरसळे सर,श्री.देवरुखकर सर, श्री. गवळी सर, कुळे सर, प्रा. जड्याळ सर,श्री.पुनस्कर सर, प्रा. सावंत मॅडम, श्री. कदम सर, श्री. अक्षय चव्हाण इ. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.*

*हा संपूर्ण कार्यक्रम इयत्ता दहावी ब च्या विद्यार्थिंनीनी नियोजन करुन यशस्वीरीत्या पार पडला.त्यांना श्री. कुळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल या विद्यार्थिंनींचे मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन कु.दिया दिपक पवार हिने केले. तर प्रास्ताविक कु.वनश्री मुकनाक हिने केले. कु.श्रावणी मुरमुरे हिने सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.*

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें