पाटपन्हाळे महावि‌द्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

*पाटपन्हाळे महावि‌द्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी*

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती “सामाजिक न्याय दिवस” म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई याच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी आपल्या मनोगतातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. विविध धर्मातील वि‌द्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा काढली. राधानगरी धरण बांधून शेतीला प्रोत्साहन दिले. सरकारी नोकरीमध्ये मागास वर्गासाठी पन्नास टक्के आरक्षण दिले. आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. अशा विविध सामाजिक कार्यातून संक्षेपात आढावा घेतला. अशा थोर महापुरुषाला आपण सर्वांनी अभिवादन करून त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन ते आचरणात आणावे म्हणजे खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज या महापुरुषाला अभिवादन केले असे म्हणता येईल असे म्हटले.

सदर कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, डॉ. दिनेश पारखे, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. सुभाष घडशी, श्री. परशुराम चव्हाण, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार डॉ. प्रवीण सनये यांनी मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें