साटवली येथे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिरा’त राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम उत्साहात संपन्न; लसीकरणास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

साटवली येथे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिरा’त राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम उत्साहात संपन्न; लसीकरणास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

 

लांजा प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण– भारत सरकारच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आज साटवली येथील ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. या मोहिमेला परिसरातील पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना पोलिओचे ‘दोन थेंब’ पाजण्यासाठी आणून उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट प्रतिसाद दिला.

 

 

एका चिमुकल्याला पोलिओचे थेंब पाजून या मोहिमेचा आरंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

उपस्थित मान्यवर आणि कर्मचारी:

या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी साटवली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गोडमवाड मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉ. गांधी मॅडम यांनी विशेष लक्ष दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण, ग्रामपंचायत प्रशासक श्री. सावंत, आरोग्य सेवक श्री. सावरडकर, आरोग्य सेवक गजानन कंटे यांनी उपस्थित राहून मोहिमेचे कौतुक केले व पालकांना मार्गदर्शन केले.

 

या मोहिमेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आशा सेविका शबाना इसफ आणि विशाखा शेलार, मदतनीस प्रांजल कालकर आणि उपकेंद्र अटेंडन्स सुगंधा जाधव यांनी अत्यंत सक्रिय भूमिका निभावून प्रत्येक मुलाला लस मिळेल याची खात्री केली.

 

पल्स पोलिओ मोहिमेच्या यशामुळे पोलिओमुक्त भारताचे स्वप्न अधिक बळकट झाले असून, स्थानिक स्तरावर आरोग्य विभागाच्या या प्रयत्नांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें