महाराणी येसूबाई चौक नामकरण नगरपरिषदेचा ऐतिहासिक ठराव ; यवतमाळ नगरपरिषदेच्या निर्णयाचे वंशज घराण्यांसह राज्यभरातून कौतुक ;

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराणी येसूबाई चौक नामकरण नगरपरिषदेचा ऐतिहासिक ठराव ;

 

यवतमाळ नगरपरिषदेच्या निर्णयाचे वंशज घराण्यांसह राज्यभरातून कौतुक ;

 

*येसुबाईं जयंती (२७ जुलै) पूर्व चौक नामकरण करत अनोखे अभिवादन*

यवतमाळ (प्रतिनिधी): स्वराज्याच्या दुसऱ्या कुलमुखत्यार आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी महाराणी येसूबाई साहेबांचा स्वराज्य रक्षणासाठी लाभलेला सर्वोच्च त्याग, लढवलेला पराक्रम, दाखवलेले शौर्य आणि तेजस्वी इतिहास भावी पिढीला सदैव प्रेरणा देत रहावा, या उदात्त हेतूने यवतमाळ शहरातील दारव्हा रोडवरील चौकाचे “कुलमुखत्यार महाराणी येसुबाई चौक” असे नामकरण करण्यास यवतमाळ नगरपरिषदेने ठराव करुन अधिकृत मंजुरी दिली असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका नगरपरिषदेने असा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शिव-शंभुभक्तांसह श्रीमंत राजेशिर्के वंशज घराण्यांकडून तसेच अवघ्या राज्यभरातून आनंद साजरा केला जात असून नगरपरिषदेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

 

यवतमाळ शहरातील चौक नामकरण होण्याकामी सामाजिक कार्यकर्त्या व ​कुलमुखत्यार महाराणी येसूबाई सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. भावनाताई पवन लेडे पाटील तसेच संस्थेच्या महिला सदस्यांनी सातत्यपूर्ण यशस्वी पाठपुरावा केला होता. दरम्यानच्या काळात भावनाताई लेडे पाटील यांनी सबंधित चौक नामकरण करण्याबाबतची व ठराव निर्णय झाल्याची सविस्तर माहिती महाराणी येसुबाईंचे वडील स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत राजे पिलाजीराव राजे शिर्के यांचे वंशज तथा राष्ट्रवादीचे प्रदेश नेते व राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शंभुसेना प्रमुख मा.दिपकराजे शिर्के तसेच इतिहास अभ्यासक व पत्रकार वंशज लक्ष्मीकांत राजे शिर्के यांना देखील दिली होती.

 

त्यानुसार लक्ष्मीकांत राजेशिर्के यांनी तात्काळ संपर्क साधत नगराध्यक्षा ॲड. कु. प्रियदर्शनी उईके, मुख्याधिकारी शुभम कॅथमवार, भावनाताई लेडे पाटील, ठराव मांडणारे नगरसेवक प्रमोद बगाडे, ठरावाला अनुमोदन देणाऱ्या नगरसेविका सौ. संगीता उमेश बोबडे, नामकरण करण्यास मोलाची साथ देणारे बीजेपी गटनेते नगरसेवक नितीनभाऊ गिरी, शैलाताई मिर्झापुरे, कीर्तीताई राऊत, नीताताई केळापुरे आदींसह उपनगराध्यक्ष, अन्य सर्व नगरसेवकांनी स्तुत्य असा निर्णय करून नामकरणाचे कार्य केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त करत कौतुक केले आहे.

 

नामकरण करण्याबाबत भावना लेडे पाटील यांनी २५ जानेवारी २०२४ रोजी नगरपरिषद यवतमाळ प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर केले होते. यावर नगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी बिना अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये नगरसेवक श्री. प्रमोद भास्कर बगाडे यांनी दारव्हा रोडवरील संबंधित चौकास “कुलमुखत्यार महाराणी येसूबाई चौक” असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सभागृहात मांडला होता. या ठरावाला सौ. संगीता उमेश बोबडे यांनी जाहीर अनुमोदन दिले होते. ​महाराणी येसुबाईंच्या २७ जुलै रोजी येणाऱ्या जयंती म्हणजेच जन्मदिना पूर्वीच चौक नामकरण केल्याने उद्याच्या येणाऱ्या जयंती निमित्त २७ जुलै रोजी महाराष्ट्रभर शिव-शंभुभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाने अभिवादन होताना दिसणार आहे.

 

यवतमाळ नगरपरिषदेचा आदर्श घेऊन महाराष्ट्रासह देशभरात स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत राजे पिलाजीराव शिर्के यांच्या राजकन्या, शिवस्नुषा, शंभुपत्नी, स्वराज्याच्या दुसऱ्या महाराणी येसुबाईंच्या (राजमाता राजाऊ ) स्वराज्य विचारांचा जागर, स्वराज्यासाठी केलेले तेजस्वी कार्य, शौर्य, त्याग याची जाणीव होण्याकामी आपल्या भागातील विविध ठिकाणांना, शाळांना, प्रशिक्षण केंद्रांना, बागांना, गावांना, शहरांना, रस्त्यांना, चौकांना, सभागृहांना अशा विविध ठिकाणी नाव देऊन नामकरण मोहिम राबवली पाहिजे, तसेच महाराणी येसुबाईंचे (शाहूमाता राजाऊंचे ) नगरपरिषदेने सदर चौकात भव्य स्मारक निर्माण करावे. तसेच जयंती २७ जुलै रोजी तर स्मृतिदिन २१ डिसेंबर रोजी राज्यभर आयोजित व्हावेत अशी अपेक्षा लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी व्यक्त केली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]