आबलोलीतील एक्सलंट अकॅडमीच्या चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

आबलोलीतील एक्सलंट अकॅडमीच्या चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

 

विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची भक्तिमय पदयात्रा; नामगजराने दुमदुमले आबलोली गाव

 

आबलोली (संदेश कदम प्रतिनिधी) :

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त गुहागर तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढलेली वारकरी दिंडी गावकऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरली. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “विठ्ठल… विठ्ठल…” नामघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय केले.

 

या दिंडीत शौर्य संजय राठोड यांनी विठ्ठलाची, तर श्रेया सचिन सोनवलकर, हर्षिता नरेंद्र रहाटे आणि अद्विका विशाल राठोड यांनी रुक्मिणीची आकर्षक वेशभूषा साकारली. नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश मीडियम स्कूल ते आबलोली बाजारपेठ, चंद्रकला उद्योग समूह मैदान, विठ्ठल-रुक्माई मंदिर आणि पुन्हा शाळा असा पदयात्रेचा मार्ग पूर्ण केला.

 

चंद्रकला उद्योग समूह मैदान येथे शिक्षणमहर्षी व माजी सभापती चंद्रकांतशेठ बाईत यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगत शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिनशेठ बाईत आणि सचिव सौ. स्नेहल सचिन बाईत यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

विठ्ठल-रुक्माई मंदिरात दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सर्व वारकऱ्यांनी विठ्ठल-रुक्माईचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी विठ्ठल-रुक्माई प्रसादिक भजन मंडळाचे सचिव अजित रेपाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे यांच्यासह सौ. शर्मिष्ठा साळुंखे, दामोदर गोणबरे, सौ. शमीम मुल्ला, सौ. शितल सोनवलकर, सौ. प्रांजली शिगवण, सौ. कांबळे, श्री. तेजस केंबळे, निमिता धुमाळे आणि शर्मिला पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें