अनाहत सिंगचा ऐतिहासिक पराक्रम! वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

अनाहत सिंगचा ऐतिहासिक पराक्रम! वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

 

इजिप्तच्या रुकाया सालेमचा सरळ सेट्समध्ये पराभव; भारताच्या स्क्वॉश इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

 

ओन्टॅरिओ (कॅनडा) :

भारतीय स्क्वॉशपटू अनाहत सिंग हिने जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरी करत वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ती भारताची पहिलीच स्क्वॉशपटू ठरली आहे. अंतिम सामन्यात १९ वर्षीय अनाहतने इजिप्तच्या द्वितीय मानांकित रुकाया सालेमचा ११-३, ११-७, ११-९ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला.

 

जोश्ना चिनप्पानंतर वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही केवळ दुसरी भारतीय खेळाडू ठरली होती. मात्र, अंतिम फेरीत विजय मिळवत तिने भारतासाठी इतिहास रचला आणि जोश्ना चिनप्पालाही न जमलेला पराक्रम करून दाखवला.

 

दिल्लीची अनाहत सिंग हिने संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळाचे प्रदर्शन केले. २०२२ ते २०२४ या कालावधीत तिला अनुक्रमे उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्षीही तिने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यंदा अखेरच्या संधीचे सोने करत तिने विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

 

विजयानंतर भावना व्यक्त करताना अनाहत म्हणाली, “मला अजूनही हे स्वप्नच वाटत आहे. या स्पर्धेत यापूर्वी अनेकदा अपयश आले होते. यंदा मात्र चित्र बदलले. या वर्षानंतर मला या स्पर्धेत खेळता आले नसते, त्यामुळे ही माझी शेवटची संधी होती.”

 

विशेष म्हणजे, तब्बल १६ वर्षांनंतर इजिप्तव्यतिरिक्त अन्य देशाच्या खेळाडूने वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. माजी विश्वविजेते ग्रेगरी गॉल्टिअर आणि भारताचे माजी आघाडीचे स्क्वॉशपटू सौरभ घोषाल यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेली अनाहत सिंग आगामी २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय स्क्वॉश संघाचे नेतृत्व करण्याची प्रमुख दावेदार मानली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें