राजापूरात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

राजापूरात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

 

रानतळे परिसरात पावसामुळे निसरड्या रस्त्यावर अपघात; सर्व प्रवासी सुखरूप, झाडाझुडपांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

 

राजापूर | प्रतिनिधी

 

राजापूर तालुक्यातील कोदवली–रानतळे–धारतळे–रत्नागिरी मार्गावर मंगळवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. मुसळधार पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने एका बसचा ताबा सुटून ती समोरून येणाऱ्या बसवर आदळली. मात्र दोन्ही चालकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर आगाराची राजापूर–पेंडखळे–चिपटेवाडी मार्गावरील एसटी बस चालक सतीश हजारे व वाहक बी. डी. सरनाईक यांच्यासह चिपटेवाडीकडे जात होती. त्याचवेळी कशेळी–राजापूर मार्गावरील एसटी बस चालक संतोष इंगळे व वाहक दळवी हे राजापूरकडे येत होते.

 

रानतळे परिसरातील उतारावर समोरून येणारी बस दिसताच कशेळी–राजापूर बसच्या चालकाने ब्रेक लावला. मात्र मुसळधार पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने बस घसरून समोरून येणाऱ्या बसवर आदळली. यावेळी चिपटेवाडी बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला घेतल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली आणि संभाव्य मोठी जीवितहानी टळली.

 

अपघातानंतर दोन्ही बसमधील प्रवाशांना तातडीने पर्यायी एसटी बसची व्यवस्था करून त्यांच्या पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असला तरी परिस्थिती लवकरच सुरळीत करण्यात आली.

 

दरम्यान, या मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडाझुडपांमुळे समोरून येणारी वाहने वेळेत दिसत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने झाडाझुडपांची छाटणी करून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


SEO Keywords:

राजापूर एसटी बस अपघात, Rajapur ST Bus Accident, रानतळे अपघात, Ratnagiri News, Rajapur News, ST Bus Collision, कोदवली रानतळे मार्ग, रत्नागिरी ताज्या बातम्या, महाराष्ट्र एसटी बातमी, राजापूर दुर्घटना.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें