जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा बापर्डे नं. १ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा बापर्डे नं. १ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 

देवगडं (बातमी -प्रज्वल गायकवाड)

-जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा बापर्डे नं. १ येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक शुभेच्छापत्रे (ग्रीटिंग कार्ड) तयार करून आपल्या शिक्षकांना तसेच पालकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

 

कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. रविकांत शिवलकर यांनी विद्यार्थ्यांना गुरूचे जीवनातील महत्त्व सांगून शिक्षण, संस्कार आणि आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी शिक्षकांचे योगदान अनमोल असल्याचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याचे आवाहन केले.

 

यावेळी श्री. घुले सर तसेच श्री. देवरे सर यांनीही विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन गुरूविषयी आदर, कृतज्ञता आणि ज्ञानाची परंपरा जपण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेत आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें