देवगडच्या मुटाट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘हेल्पर इलेक्ट्रिकल टेक्निशियन’ प्रशिक्षण मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले

देवगडच्या मुटाट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘हेल्पर इलेक्ट्रिकल टेक्निशियन’ प्रशिक्षण मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले

जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचा उपक्रम; दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची माहिती

देवगड | प्रतिनिधी : प्रज्वल गायकवाड 

देवगड तालुक्यातील मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट तसेच कै. सौ. जानकीबाई शिवराम राणे कला व वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय, मुटाट येथे सोमवार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी भारत सरकारच्या जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘हेल्पर इलेक्ट्रिकल टेक्निशियन’ प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमात जन शिक्षण संस्थानचे डायरेक्टर मा. श्री. पालव, मा. सौ. शिर्के मॅडम, मा. श्री. हळदणकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. श्री. दिलीप घरपणकर, सहाय्यक शिक्षक मा. श्री. अनिल घुगे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री. घरपणकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे रोप भेट देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनिल घुगे यांनी केले.

 

यावेळी इयत्ता दहावी तसेच अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्य विकास, हेल्पर इलेक्ट्रिकल टेक्निशियन अभ्यासक्रमाचे स्वरूप, प्रशिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या विविध पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

यावेळी बोलताना जन शिक्षण संस्थानचे डायरेक्टर श्री. पालव यांनी, “सध्याचे युग हे तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्सचे असून कौशल्य विकासावर आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण हे रोजगार व व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे सांगितले.

 

मुख्याध्यापक श्री. दिलीप घरपणकर यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाचा स्वीकार करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. सहाय्यक शिक्षक श्री. अनिल घुगे यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे महत्त्व आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या संधींबाबत प्रभावी मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच सर्व मान्यवरांनी शाळेतील स्किल डेव्हलपमेंट लॅबला भेट देऊन तेथील सुविधा व प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें