मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८व्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न!

highlits

📰 बातमी / जाहिरात
🇮🇳 मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८व्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न! 🩸

वैभववाडी (दि. ८ऑगस्ट २०२६ प्रतिनिधी प्रज्वल गायकवाड
देशाचे रक्षण करताना वैभवाडी तालुक्याचे नाव उंचावणारे हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे (सडुरे) यांच्या ८व्या स्मृतिदिनानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे पार पडलेल्या या शिबिराला वैभववाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळी ९:३० वाजता सुरू झालेल्या या शिबिरामध्ये परिसरातील तरुणांनी आणि नागरिकांनी मोठ्या جوशामध्ये सहभाग घेतला. या शिबिरात एकूण २० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली.
प्रमुख आयोजक:

आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, वैभववाडी

रावराणे मित्र मंडळ, वैभववाडी

राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट
रक्तदानासारख्या पवित्र आणि मानवकल्याणकारी कार्यात सहभाग घेऊन शिबीर यशस्वी करणाऱ्या सर्व २० रक्तदात्यांचे सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आणि सर्व आयोजक समितीच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले.
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीद मेजर कौस्तुभ रावराणे साहेबांना उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि मानाचा मुजरा केला. 🙏🇮🇳

बातमी दार – प्रज्वल गायकवाड

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राहुल गांधींकडून उपोषण सोडवण्यासाठी प्रतिसादच मिळाला नाही; सोनम वांगचुक यांचा मोठा दावा २६ दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांचा खुलासा; काँग्रेसकडून ट्रोलिंगचा आरोप, सरकारशी ‘मिडनाईट डील’ झाल्याचेही फेटाळले

राज्य

शहर चुनें