शृंगारतळी जि. प. गटाच्या विभाग प्रमुखपदी अतुलशेठ लांजेकर यांची नियुक्ती

शृंगारतळी जि. प. गटाच्या विभाग प्रमुखपदी अतुलशेठ लांजेकर यांची नियुक्ती

 

आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; शिवसेना ठाकरे गटाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली

 

आबलोली (संदेश कदम) :

गुहागर तालुक्यातील झोंबडी गावचे सरपंच, तसेच आमदार भास्करशेठ जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अतुलशेठ लांजेकर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शृंगारतळी जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार भास्करशेठ जाधव यांनी पक्ष कार्यालयात ही नियुक्ती जाहीर करून अतुलशेठ लांजेकर यांना नियुक्तीपत्र दिले.

 

अतुलशेठ लांजेकर हे नम्र स्वभावाचे आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे तत्परतेने मार्गी लावणारे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क असून पक्ष संघटना वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे.

 

त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शृंगारतळी जिल्हा परिषद गटात जल्लोष करण्यात आला. अतुलशेठ लांजेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

यावेळी आमदार भास्करशेठ जाधव यांनी अतुलशेठ लांजेकर यांना शुभेच्छा देताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची ध्येय-धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे काम त्यांच्या हातून घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

या नियुक्तीवेळी जिल्हाप्रमुख विक्रांतदादा जाधव, तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळ्ये यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें