अन्न व औषध प्रशासनाची गुहागरमध्ये धडक कारवाई; विनापरवाना चिकन सेंटरला दंड, व्यवसाय बंदची नोटीस

अन्न व औषध प्रशासनाची गुहागरमध्ये धडक कारवाई; विनापरवाना चिकन सेंटरला दंड, व्यवसाय बंदची नोटीस

शृंगारतळीतील कारवाईनंतर व्यावसायिकाने तातडीने घेतला अन्न सुरक्षा परवाना; खाद्य व्यवसायिकांना नोंदणीचे आवाहन

गुहागर (संदेश कदम) : गुहागर तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षा नियमांची तपासणी मोहीम सुरू केली असून, शृंगारतळी येथे विनापरवाना सुरू असलेल्या चिकन सेंटरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी परदेशी मॅडम यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत संबंधित चिकन सेंटरकडे आवश्यक अन्न सुरक्षा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाला दंड ठोठावून व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली.

प्रशासनाच्या कारवाईनंतर संबंधित व्यावसायिकाने तातडीने रीतसर नोंदणी करून अन्न सुरक्षा परवाना घेतला आहे.

चौपाटीवरील खाद्य व्यवसायांचीही तपासणी

या तपासणी मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी परदेशी मॅडम आणि त्यांच्या पथकाने गुहागर चौपाटीवरील स्नॅक्स सेंटर तसेच इतर छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी केली. यावेळी खाद्यपदार्थ तयार करताना व विक्री करताना पाळावयाचे स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियम व्यावसायिकांना समजावून सांगण्यात आले.

तसेच गुहागर शहरातील एका हॉटेलचीही अन्न सुरक्षा मानांकनाच्या निकषांनुसार तपासणी करण्यात आली.

आगामी काळात तालुक्यात व्यापक तपासणी

गुहागर तालुक्यातील इतर खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायिक केंद्रांचीही आगामी काळात टप्प्याटप्प्याने तपासणी करण्यात येणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी परदेशी मॅडम यांनी सांगितले.

त्यामुळे ज्या छोट्या-मोठ्या अन्न व्यवसायिकांनी अद्याप आपल्या व्यवसायाची नोंदणी केलेली नाही किंवा आवश्यक परवाना घेतलेला नाही, त्यांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तात्काळ रीतसर नोंदणी करून आवश्यक परवाना घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें