*केंद्र शाळा गुहागर नंबर दोन शाळेचा अनोखा उपक्रम
*वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट
गुहागर (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद केंद्र शाळा गुहागर नंबर दोन शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी कुमार शिवम शैलेश मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची अनोखी भेट देण्यात आली .त्यावेळी केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील, केंद्र मुख्याध्यापिका मनीषा शिंदे मॅडम, विषय शिक्षक शिवानंद साखरे सर व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी कुमार शिवम शैलेश मयेकर याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. खाऊचे पैसे साठवून कुमार शिवम मयेकर याने त्याला मिळालेल्या खाऊच्या पैशातून बचत करून आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्याबद्दल केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील,मुख्याध्यापिका मनीषा शिंदे मॅडम, विषय शिक्षक श्री शिवानंद साखरे व शिक्षिका स्नेहा लोंढे मॅडम यांनी त्याचे कौतुक केले.














