कोकणस्थ कुंभार समाज युवा कलामंचाचा कलाअविष्काराने मान्यवरांची मने जिंकली

कोकणस्थ कुंभार समाज युवा कलामंचाचा कलाअविष्काराने मान्यवरांची मने जिंकली

: पिंपरी-चिंचवड येथील कौटुंबिक स्नेहमेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात; ‘कोकणची नमनकला’सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत

प्रतिनिधी : मंगेश जाधव

पुणे : कोकणस्थ कुंभार समाज पिंपरी-चिंचवड, पुणे संस्थेचा कौटुंबिक स्नेहमेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा १५ ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी कोकणस्थ कुंभार समाज युवा कलामंचाच्या कलाकारांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संस्थेचे पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. संस्थेचे खजिनदार श्री. किरण पवार यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला.

समाजासाठी आजवर दिलेल्या योगदानाबद्दल श्री. शंकर धारू साळवी यांना ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. सत्यवान साळवी, युवा अध्यक्ष श्री. सुहास शिरकर आणि महिला अध्यक्षा सौ. रेश्माताई साळवी यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला श्री. सतिशदादा दरेकर, श्री. सुभासराव गुडेकर, श्री. प्रकाशशेठ साळवी, श्री. प्रकाश महाराज निवळकर, श्री. महेशजी पडवेकर, श्री. नाना पालकर, श्री. उमेशजी खैर, पंचायत समिती सदस्या सौ. उर्वी उमेश खैर, नगरसेवक श्री. पंढरीनाथ मायशेट्ये यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘कोकणची नमनकला’ ठरली आकर्षण

श्री. विजय निवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणस्थ कुंभार समाज युवा मंचाने ‘कोकणची नमनकला’ हा दर्जेदार कलाविष्कार सादर केला. विविध कलाकारांनी आपल्या अभिनय व कलेची झलक दाखवत उपस्थितांची दाद मिळवली.

कृष्णाच्या भूमिकेतील कु. अन्वी मंगेश साळवी आणि कंसाच्या भूमिकेतील श्री. सारंग पालकर यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अविनाश बागावडे, मंगेश साळवी, रेश्मा साळवी, मान्यता साळवी, पूजा निवळकर, करुणा निवळकर, कांचन साळवी आणि सौ. गुडेकर वहिनी यांच्या टीमने वासुदेव गीतासह पौराणिक परंपरेचे सुंदर सादरीकरण केले.

सुचिता पवार व टीमने सादर केलेल्या उत्कृष्ट कोळी नृत्यालाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कु. ओवी प्रमोद देविलकर हिने सादर केलेल्या ‘हिरकणी’ या कलाविष्कारानेही उपस्थितांची मने जिंकली.

युवा शाहीर प्रितेश राऊत आणि ढोलकीपट्टू प्रतिक साळवी यांच्या कलेला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. सोनाली साळवी व सहकाऱ्यांनी गणेशवंदन गीतावर नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई साळवी यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कौटुंबिक स्नेहमेळावा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य  : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा

Horoscope

Weather

और पढ़ें

भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य  : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा

राज्य

शहर चुनें