आबलोलीचे सुपुत्र श्रीश सुर्वे आणि अद्वैत ढवळ यांची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

 आबलोलीचे सुपुत्र श्रीश सुर्वे आणि अद्वैत ढवळ यांची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

: नागपूर येथील १४ वर्षांखालील रत्नागिरी जिल्हा संघात समावेश; गुहागर तालुक्यासह आबलोली गावातून कौतुकाचा वर्षाव

बातमी:

आबलोली (संदेश कदम): गुहागर तालुक्यातील आबलोली गावातील दोन बालखेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करत गावाच्या नावात भर घातली आहे. एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल, आबलोली येथील इयत्ता ८ वीतील विद्यार्थी श्रीश स्वप्नील सुर्वे आणि चंद्रकांत बाईत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, आबलोली येथील इयत्ता ८ वीतील विद्यार्थी अद्वैत वैभव ढवळ यांची १४ वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे.

नागपूर येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडणार असून, या स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे आणि आबलोली गावाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही गुणवंत खेळाडू डॉ. योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवत आहेत.

आबलोलीसारख्या ग्रामीण भागातून दोन खेळाडूंची थेट जिल्हा संघात झालेली निवड ही संपूर्ण गुहागर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या यशाबद्दल आबलोली गावासह संपूर्ण परिसरातून या दोन्ही खेळाडूंचे कौतुक होत आहे. गावातील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी श्रीश सुर्वे आणि अद्वैत ढवळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना नागपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्या आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें