रत्नागिरी-लांजा बसमध्ये सापडलेले पाच हजारांचे पाकीट विद्यार्थ्याने केले परत

रत्नागिरी-लांजा बसमध्ये सापडलेले पाच हजारांचे पाकीट विद्यार्थ्याने केले परत

 

बेनी बुद्रुकच्या चिन्मय जाधवने दाखवला प्रामाणिकपणा; माणुसकीच्या कृतीचे सर्वत्र कौतुक

 

लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण

माणुसकी आणि प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचे दाखवून देणारी कौतुकास्पद घटना रत्नागिरी-लांजा बसमध्ये घडली. प्रवासादरम्यान हरवलेले पाच हजार रुपये रोख रकमेसह असलेले पाकीट बेनी बुद्रुक येथील विद्यार्थी कु. चिन्मय जाधव याला सापडले. कोणताही मोह न बाळगता त्याने हे पाकीट संबंधित प्रवासी मंगेश कवचे यांच्याकडे सुरक्षितपणे परत केले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश कवचे हे रत्नागिरीहून साटवली-लांजा मार्गावरील बसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान पाच हजार रुपयांची रोकड तसेच महत्त्वाची कागदपत्रे असलेले त्यांचे पाकीट बसमध्येच राहिले. बसमधून उतरल्यानंतर पाकीट हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याचा शोध घेण्यासाठी तातडीने पाठपुरावा सुरू केला.

 

दरम्यान, गोळवशीहून लांजाकडे बस येत असताना बसमध्ये प्रवास करणाऱ्या बेनी बुद्रुक येथील चिन्मय जाधव याला हे पाकीट सापडले. पाकीट मिळाल्यानंतर त्यातील रक्कम आणि कागदपत्रे पाहून चिन्मयने प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला.

 

त्यानंतर चिन्मयने पाच हजार रुपये रोख रकमेसह असलेले पाकीट मंगेश कवचे यांच्याकडे सुरक्षितपणे सुपूर्द केले. पाकीट परत मिळाल्याने कवचे यांनी समाधान व्यक्त करत चिन्मयचे आभार मानले.

 

आजच्या काळातही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपणाऱ्या चिन्मय जाधवच्या या कृतीचे मंगेश कवचे, स्थानिक ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. एका विद्यार्थ्याने दाखवलेल्या या प्रामाणिकपणातून समाजासाठी सकारात्मक संदेश मिळाला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें