पाचेरी सडा नं. १ शाळेत सांस्कृतिक कलामंचासाठी ६०,००० रुपये किमतीचे पत्रा शेड सुपूर्द; माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचा स्तुत्य पुढाकार
विशेष प्रतिनिधी / पाचेरी सडा:
पाचेरी सडा नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची उत्तम सोय व्हावी, या उद्देशाने शाळेचे माजी विद्यार्थी *श्री. शंकरजी मालप, श्री. रत्नाकरजी डिंगणकर,* शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पालकवर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने *६०,००० रुपये* किमतीचे पत्रा शेड भेट म्हणून देण्यात आले.
शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नवनिर्मित पत्रा शेड आणि कलामंचाचे हस्तांतरण करण्यात आले. या पत्रा शेडमुळे आता विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक उपक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन, व्याख्याने आणि इतर शालेय कार्यक्रम ऊन-पावसाची चिंता न करता उत्साहात साजरे करता येणार आहेत.
याप्रसंगी माजी विद्यार्थी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या शाळेबद्दलचे ऋण व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी व पालकांनी दाखवलेल्या या सामाजिक दातृत्वाचे आणि सहकार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
*पाचेरी आगर केंद्राच्या केंद्रीय प्रमुख सौ. गीतांजली जाधव मॅडम , शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय वाघ सर व शाळेतील सर्व शिक्षकांनी या अमूल्य मदतीबद्दल माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्गाचे मनःपूर्वक आभार मानले.🙏*












