तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; रत्नागिरीत शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला मंजुरी

highlight

तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; रत्नागिरीत शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला मंजुरी

डीपीडीसीच्या माध्यमातून यूपीएससी-मपीएससी मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय; मिलिंद आत्माराम चाचे यांनी सहकार्य करणाऱ्या नेते, पदाधिकारी व संस्थांचे मानले आभार

Milind cha

गुहागर / रत्नागिरी :

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एमपीएससी-यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या केंद्राबाबत निर्णय झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

 

या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांनी गेल्या तीन वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२३ रोजी या संदर्भातील मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर विविध राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला.

 

श्री. चाचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. अशोक चव्हाण, आमदार श्री. भाई जगताप, तसेच तत्कालीन नगरसेवक श्री. आत्माराम लक्ष्मण चाचे यांनी या मागणीसाठी सहकार्य केले. तसेच आमदार श्री. किरण सामंत यांच्याकडेही या विषयाबाबत मागणी करण्यात आली होती.

 

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एमपीएससी-यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याचे २८ सप्टेंबरच्या बैठकीनंतरच्या वृत्तात नमूद आहे. त्याच बैठकीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकादमी उभारण्याचाही निर्णय सांगण्यात आला.

 

अभ्यासिकेसोबत मार्गदर्शनाची सुविधा

 

प्रस्तावित केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुविधा मिळण्यासोबतच तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नियमित वर्ग, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संदर्भ पुस्तके तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष मार्गदर्शन सत्रे उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे श्री. चाचे यांनी सांगितले. यूपीएससी, एमपीएससी तसेच बँकिंगसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे.

 

या मागणीसाठी सहकार्य करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार भाई जगताप, उदय सामंत, आत्माराम लक्ष्मण चाचे तसेच निर्मल ग्रामपंचायत पाचेरी सडा, निर्मला ग्रामपंचायत कुडली बंदरवाडी, माध्यमिक विद्यालय कुडली आणि द मॉडेल इंग्लिश हायस्कूल सैतावडे यांचे श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांनी आभार मानले आहेत.

 

**रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी स्थानिक पातळीवर मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.**

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें