साईनाथ रामपूरकर यांचे ७५वे रक्तदान; शंभर रक्तदानांचा संकल्प

*साईनाथ रामपूरकर यांचे ७५वे रक्तदान; शंभर रक्तदानांचा संकल्प

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : न्यू सातारा वेल्फर सेंटर, चिंचपोकळी, मुंबई समूहातर्फे २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेतर्फे गेल्या ३२ वर्षांपासून सलग रक्तदान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून रक्तदानाची सामाजिक चळवळ सातत्याने सुरू आहे.

 

या रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदाता साईनाथ रामपूरकर यांनी आयुष्यातील ७५वे रक्तदान करून उल्लेखनीय टप्पा गाठला. त्यांचा संस्थेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजाराम (नाना) निकम यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे वरिष्ठ संचालक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

 

साईनाथ रामपूरकर रक्तदानासोबतच सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातही कार्यरत आहेत. गरजू रुग्णांना रुग्णालयातील बिल माफ करून देण्यासाठी ते प्रयत्न करतात. रुग्णांना आवश्यक ती मदतही करतात. त्यांच्या या सेवाभावी कार्यातून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.

 

रामपूरकर दर शनिवारी टाटा हॉस्पिटल, परळ येथे अन्नदान करतात. गरजू लोकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठीही ते प्रयत्नशील असतात. समाजसेवा हेच आपल्या आयुष्याचे ध्येय असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते. या कार्यासाठी ते कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत इतरांकडून घेत नसल्याचे सांगण्यात आले.

 

रक्तदानाचा ७५वा टप्पा पार केल्यानंतर रामपूरकर यांनी पुढील आयुष्यात १०० रक्तदानांचा आकडा पार करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें