*राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आलोय – आम. अनिकेत तटकरे*
आबलोली (संदेश कदम)
जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या राष्ट्रवादी पक्ष हा या ठिकाणी स्वतंत्रपणे लढला पण राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीचे सरकार सामील असताना निश्चितपणे संघटना वाढीच्या दृष्टीने प्रत्येकाला तो अधिकार आहे.आमचा हेतू हाच आहे की गुहागर मध्ये राष्ट्रवादी पक्षाला नवचैतन आणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी गुहागर मध्ये आलो आहे. असे स्पष्ट प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.
आमदार अनिकेत तटकरे पुढे म्हणाले की, गुहागर मध्ये जी काही विकास कामे खासदार साहेबांकडून अपेक्षित आहेत. मी आमदार म्हणून अपेक्षित आहेत. सरकारकडून अपेक्षित आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे आणि संघटना वाढीच्या दृष्टीने सुद्धा जे काही शक्य असेल ते करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
बेरोजगारीवर बोलताना आमदार अनिकेत तटकरे पुढे म्हणाले की, गुहागर तालुक्याला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी आहे.निसर्गाने आपल्या कोकणाला भरभरून दिलेले असल्याने आपल्या भागातील होतकरू तरुणांना, भगिनींना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना चालू आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्यांना आर्थिक सक्षम करू शकतो निश्चितच या भागातील तरुणांना रोजगार आणि या भागातील आर्थिक सक्षमता व्यवस्थित आणू शकतो असा विश्वासही आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या माध्यमातून जेव्हा विधानसभा लढवली गेली तेव्हा सुद्धा तटकरे साहेब आपल्याला गुहागरला दिसले नाहीत तटकरे साहेबांची कुठेतरी गुहागर तालुक्यासाठी नाराजी दिसते असा प्रश्न विचारतातच आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की, नाही कृपया तसं कुणी म्हणू नये. कारण आजही बैठकीसाठी तटकरे साहेबांनी स्वतःहून या ठिकाणी वेळ दिलेली होती. त्यावेळेस आपण पाहिलंत विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि कालच माननीय उपमुख्यमंत्री महोदया आमच्या राष्ट्रीय नेते असून नेत्रा वहिनी यांनी त्यांना त्या ठिकाणी प्रदेशा अध्यक्ष पदी प्राचारण केले,पक्षाचे प्रमुख नेते असल्यामुळे देशाची राज्याची त्यांच्यावर अधिकशी जबाबदारी असल्यामुळे स्वभाविक ते इथे येऊ शकले नाहीत. पण पुढच्या कालखंडामध्ये तटकरे साहेब नक्की येतील.
दुष्काळावर बोलताना आमदार अनिकेत तटकरे पुढे म्हणाले की,पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त नाही रायगड जिल्ह्यात एकच श्रीवर्धन तालुका जाहीर झालाय. रत्नागिरी मध्ये तीन तालुके जाहीर झालेत. सिंधुदुर्ग मध्ये मला वाटतं एक तालुका त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे आमची कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची राज्य सरकारकडे मागणी आहे की इतर भागात, विभागात असलेली परिस्थिती वेगळी आहे एकतर आमच्या कोकणात करिता न लावता आपल्या कोकणातील सर्व तालुके उर्वरित आहेत त्यांना तालुक्यांना सुद्धा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे ही आमची आग्रही मागणी आहे असेही आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले.
यूपीएससीच्या परीक्षेबाबत विचारले असता आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की याबाबतीत बोलताना माझ्यासारखा कार्यकर्ता बोलायला फार लहान आहे. या बाबतीत राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल ते योग्यपणे दखल घेतील मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत. तसेच गृहमंत्री अमितभाई त्या ठिकाणी चांगलं काम करताहेत. सरकार त्या बाबतीत योग्य दखल घेईल असे आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले












