२००३ एस.एस.सी. बॅचकडून विद्यालयाला १६ सीलिंग फॅनची भेट: माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता; विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा वाढविण्यास हातभार

 

२००३ एस.एस.सी. बॅचकडून विद्यालयाला १६ सीलिंग फॅनची भेट,

माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता; विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा वाढविण्यास हातभार

गुहागर : येथील गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स.सु. पाटील विज्ञान, श्री. महेश जनार्दन भोसले वाणिज्य आणि कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर या विद्यालयाच्या २००३ सालच्या एस.एस.सी. बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला १६ सीलिंग फॅनची सस्नेह भेट देत शाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली.

 

विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्ये अधिक चांगल्या, प्रसन्न आणि आरामदायी वातावरणात शिक्षण घेता यावे, या उद्देशाने माजी विद्यार्थ्यांनी ही उपयुक्त भेट दिली. या उपक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 

या प्रसंगी विद्यालयाच्या वतीने २००३ एस.एस.सी. बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शाळेने दिलेल्या संस्कारांची जाणीव ठेवून माजी विद्यार्थ्यांनी केलेले हे योगदान कौतुकास्पद असून, त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

 

यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे, उपमुख्याध्यापिका श्रीम. मनिषा सावंत, पर्यवेक्षिका सौ. गायत्री कनगुटकर, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

विद्यालयाच्या वतीने २००३ एस.एस.सी. बॅचमधील सर्व माजी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे यांनी मनःपूर्वक आभार मानले.SEO Keywords: गुहागर बातमी, २००३ SSC बॅच, माजी विद्यार्थी, १६ सीलिंग फॅन भेट, गुहागर एज्युकेशन सोसायटी, श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर शाळा, माजी विद्यार्थ्यांचे योगदान, शैक्षणिक सुविधा.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें