खोडदे येथे आई नवलाई देवीचा दसरा (दसरा गवर) उत्सव विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरा होणार

*खोडदे येथे आई नवलाई देवीचा दसरा (दसरा गवर) उत्सव विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरा होणार*

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील खोडदे सहाणवाडी येथील नवसाला पावणाऱ्या आई इच्छापूर्ती नवलाई देवीचा दसरा ( दसरा गवर)उत्सव रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 ते मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात येणार असून खोडदे पंचक्रोशीतील नागरिकांनी आणि भाविकांनी संपूर्ण कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून आई नवलाई देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व आईकडून मनोकामना पूर्ण करून घ्यावी असे आवाहन खोडदे सहाणवाडी येथील आई नवलाईदेवी देवस्थान मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8:00 वाजता घटस्थापना करण्यात येणार असून दुपारी 03:00 वाजता रुपे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या दिवशी रात्री 10:00 ते 11:00 यावेळेत स्थानिक मंडळांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री 11:00 ते 11:30 देवीची पहिली आरती त्यानंतर रात्री 11:30 ते 12:30 या वेळेत जाखडी नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे त्यानंतर रात्री 12:30 वाजता देवीची दुसरी आरती होणार आहे .गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:30 वाजता निमंत्रित जाखडी नृत्य सादर होणार असून शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:30 वाजता निमंत्रित जाखडी नृत्य सादर होणार आहे.

रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:30 वाजता निमंत्रित जाखडी नृत्य सादर होणार असून मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर (दसरा) 2026 रोजी दुपारी 03:30 वाजता नवलाई देवीच्या देवळात आणि अंगणात जाखडी नृत्य सादर होणार असून सायंकाळी 04:30 वाजता सोने लुटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री 10:00 वाजता स्थानिक मंडळाचे भजन सादर होणार आहे. त्यानंतर रात्री 11:00 वाजता आईची आरती होणार असून रात्री 11:30 वाजता जाखडी नृत्य सादर होणार आहे. त्यानंतर रात्री 12:30 वाजता गौरीचे नवस फेडण्याचा कार्यक्रम संपन्न होणार असून रात्री 01:30 वाजता आईची दुसरी आरती होईल आणि गौरीचे विसर्जन होईल या संपूर्ण कार्यक्रमाला खोडदे पंचक्रोशीतील नागरिकांनी आणि भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन खोडदे सहाणवाडी नवलाईदेवी देवस्थानचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें