दुष्काळावर मात करत जिल्हा जलसमृद्ध करा – वैदेही रानडे

दुष्काळावर मात करत जिल्हा जलसमृद्ध करा – वैदेही रानडे

१० हजारांपेक्षा जास्त वनराई व विजय बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट

प्रतिनिधी (मंगेश जाधव)

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. जिल्ह्याला जलसमृद्ध करण्यासाठी प्रशासनाने ‘मिशन बंधारे’ ही व्यापक लोकचळवळ हाती घेतली असून, त्याअंतर्गत जिल्ह्यात तब्बल १० हजारांपेक्षा जास्त वनराई व विजय बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, दुष्काळावर मात करत रत्नागिरी जिल्हा जलसमृद्ध करावा,” असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.*

 

जिल्हा वार्षिक नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी जिल्ह्यात जास्तीत जास्त वनराई व विजय बंधारे बांधून संभाव्य पाणीटंचाईचे संकट दूर करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

 

आजवर जिल्ह्यात सुमारे २ ते अडीच हजार बंधारे पूर्ण झाले असून, एकाच दिवशी विशेष संकल्प करून सुमारे ३ ते साडेतीन हजार बंधारे बांधण्याचे भव्य नियोजन यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेले जात आहे, असे सांगून श्रीमती रानडे म्हणाल्या, या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबरच गावोगावच्या नागरिकांचा यामध्ये असलेला उत्स्फूर्त सहभाग!

 

जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवरील अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ श्रमदानात थेट उतरले आहेत. विशेषतः वयोवृद्ध व ज्येष्ठ महिलांनी दाखवलेला उत्साह आणि कष्ट पाहण्यासारखे असून हा उपक्रम खऱ्या अर्थाने एका लोकचळवळीत परावर्तित झाला आहे.

 

“प्रत्येक गावाने पुढे येत मोठ्या संख्येने वनराई बंधारे बांधावेत आणि दुष्काळावर मात करत रत्नागिरी जिल्हा जलसमृद्ध करावा,” असे प्रेरणादायी आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी यावेळी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें