शिवभोजन केंद्रे की भ्रष्टाचारांचा अड्डा परिमंडळ अधिकारी नुसताच रबरी शिक्का यशवंत पवार यांची तक्रार दाखल अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या कारवाईकडे लक्ष

शिवभोजन केंद्रे की भ्रष्टाचारांचा अड्डा परिमंडळ अधिकारी नुसताच रबरी शिक्का यशवंत पवार यांची तक्रार दाखल अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या कारवाईकडे लक्ष

सोलापूर (प्रतिनिधी ) महाराष्ट्र सरकार ने गोरगरीब व गरजू लोकांना सवलतीच्या दरात जेवण मिळावे कोणीही गोरगरीब व गरजू उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात शिवभोजन केंद्रे सुरू केले होते गोरगरीब गरजू व लोकांच्या कल्याणासाठी ही योजना राबविण्यात येत आहे दोन चपाती एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ असे जेवण शिव भोजन केंद्रातून गोरगरीब व गरजू लोकांना दिले जाते .

महाराष्ट्र राज्यातील शिवभोजन केंद्रांना राज्यसरकार कडून लाखो रुपयांचे अनुदान दिले जाते. केवळ कागदावर संख्या वाढवून शिवभोजन केंद्र चालक राज्य सरकारचे लाखो रुपयाचे अनुदान मिळवत आहेत.

परिमंडळ कार्यालय अ विभागात अनेक शिवभोजन केंद्रे असून काही शिवभोजन केंद्रात स्टीलची भांडी नसणे शिव भोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हातमोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वॉश बेसिन नसणे घरगुती गॅसचा वापर करणे सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे त्याच बरोबर शिवभोजन थाळी पार्सल देणे असा प्रकार आढळून येत आहे सदरची बाब अतिशय गंभीर असून शिवभोजन केंद्राच्या मूळ उद्देशाला हरताळ फसणारी आहे सोलापूर शहरातील अ विभागातील शिवभोजन केंद्राची तपासणी व कारवाई बाबत परिमंडळ अधिकारी अ विभागाचा अंकुश नसून ते केवळ रबरी शिक्का असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे परिमंडळ कार्यालय अ विभागातील भागातील काही शिवभोजन केंद्रातील दोष त्रुटी बाबत

अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय कढून कारवाई केली जात नसल्याचे चित्र देखील दिसून येत आहे

सोलापूर शहरातील परिमंडळ अ विभागातील शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारचे दोष आहेत परंतु अ विभागातील परिमंडळ अधिकारी हे आपल्या भागातील शिवभोजन केंद्र चालकांना तपासणीच्या गोंडस नावाखाली केवळ नोटीसा काढत असून त्या नोटीसांचे पुढे काय होते? याची मात्र माहिती देत नसल्याचे शिवभोजन केंद्रावर कारवाई होणार की नाही? ही बाब गुलदस्त्यात असून अश्या शिवभोजन केंद्रामुळे राज्य सरकार ला लाखों रुपयांचा अनुदान पोटी चुना लागत आहे हे मात्र नक्कीच

परिमंडळ अ विभागातील काही शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारच्या त्रुटी व दोष आहेत.

राज्य सरकार ला अनुदानपोटी लाखों रुपयांना गंडवणाऱ्या शिवभोजन केंद्रावर कारवाई व्हावी म्हूणन ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर शहर यांच्याकडे लेखी तक्रार केली असून परिमंडळ कार्यालय अ विभागातील दोषी असलेल्या शिवभोजन केंद्रावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे परिमंडळ कार्यालय अ विभागातील शिवभोजन केंद्रे हे भ्रष्टाचारांचा अड्डा बनले असून राज्य सरकार च्या तिजोरी वर डल्ला मारण्याचे काम परिमंडळ कार्यालय अ विभागातील शिवभोजन केंद्र चालक करीत आहेत असा आरोप जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी केला असून परिमंडळ कार्यालय अ विभागातील शिवभोजन केंद्रात होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत यापूर्वी देखील वृत्त प्रकाशित केले होते परंतु अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी परिमंडळ कार्यालय अ विभागातील कोणत्याही शिवभोजन केंद्रावर कारवाई करत नसल्याने परिमंडळ कार्यालय अ विभागातील शिवभोजन केंद्र चालकांचे चांगलेचं फावले असून राज्य सरकारला लाखो रुपयाचा चुना लावून देखील अशा भ्रष्ट शिवभोजन केंद्रावर कारवाई केली जात नाही ही बाब अतिशय गंभीर असून राज्य सरकार च्या शिवभोजन योजनेच्या मूळ उद्देशाला काळीमा व हरताळ असणारी आहे परिमंडळ कार्यालय अ विभागातील राज्य सरकारला गंडवणाऱ्या शिव भोजन केंद्राची स्वतंत्र अधिकारी मार्फत तपासणी व दोषी असलेल्या शिव भोजन केंद्रावर कारवाई करण्यात यावी त्याच बरोबर शिव भोजन केंद्राची मान्यता रद्द करणेबाबत ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर शहर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली असून परिमंडळ कार्यालय अ विभागातील दोषी असलेल्या शिवभोजन केंद्रावर कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

नंदकुमार बगाडेपाटिल पत्रकार

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें