वर्षा विनायक चव्हाण यांना ‘भारत निर्माण योगदान अवॉर्ड २०२५’ सन्मान
शिवसेना महिला संपर्कप्रमुख वर्षा चव्हाण यांच्या सामाजिक कार्याची दखल; गोवा येथे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव

रत्नागिरी : आपला वैभव फाउंडेशन अँड पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट आयोजित ‘भारत निर्माण योगदान अवॉर्ड २०२५’ सोहळा गोव्याच्या मेक्निझ पॅलेस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना महिला संपर्कप्रमुख (बदलापूर पूर्व) वर्षा विनायक चव्हाण यांना ‘सर्वोत्तम सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार गोव्याचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमास केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद भाऊ नाईक, गोवा विधानसभेचे सभापती डॉ. रमेश तवडकर, आमदार व गोवा एंटरटेनमेंट सेंटरचे व्हाईस चेअरमन डीलायला लोबो, डॉ. घनश्याम, सामाजिक कार्यकर्त्या व आयोजक ऐश्वर्या साळगावकर, तसेच आपला वैभव फाउंडेशनचे संस्थापक वैभव वीरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्षा चव्हाण यांनी हा सन्मान स्वीकारताना सर्व आयोजकांचे, सहकाऱ्यांचे आणि आपल्यावर विश्वास टाकणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेतल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
#भारतनिर्माणअवॉर्ड #वर्षाचव्हाण #ShivSena #SocialWork #GoaEvent #RatnagiriNews #WomenLeadership #आपलावैभवफाउंडेशन