पिंपरच्या सोमजाई देवी शिमगोत्सव व पालखी उत्सवाला उत्साही प्रतिसाद!

पिंपरच्या सोमजाई देवी शिमगोत्सव व पालखी उत्सवाला उत्साही प्रतिसाद!

फाल्गुन पंचमीपासून गुढीपाडव्यापर्यंत नवनवीन धार्मिक कार्यक्रम, गावकऱ्यांच्या एकत्रित सहभागाने जल्लोषात पार!

उत्सवात सहभागी झालेल्या देवींची नावे – श्री सोमजाई देवी, वाघजाई देवी, मानाई देवी आणि चंडिकाई देवी – या देवतांच्या जयघोषाने अवघा परिसर भक्तिमय झाला.

गुहागर  पिंपर गावातील श्री सोमजाई देवीचा पारंपरिक शिमगोत्सव आणि पालखी उत्सव यंदाही भक्तिमय आणि उत्साहात पार पडला. मुंबई, पुणे तसेच इतर शहरांतील व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उत्सवासाठी पिंपरला जमले.उत्सवात पारंपरिक पद्धतीने  श्री सोमजाई देवी, वाघजाई देवी, मानाई देवी आणि चंडिकाई देवी – पालखी नाचवने आणि या देवतांच्या जयघोषाने अवघा परिसर भक्तिमय झाला.

 

शिमगोत्सवाची सुरुवात फाल्गुन फाग पंचमी (06 मार्च 2025) पासून करण्यात आली. प्रत्येक वाडीत पारंपरिक होळी पेटवून नऊ दिवसांचे कार्यक्रम सुरू झाले. 13 मार्च रोजी देवीची पालखी सजवून सहाणेवर माडहोळी सहित विराजमान करण्यात आली. त्याच रात्री पौर्णिमेच्या पहिल्या होमने धार्मिक विधींचा शुभारंभ झाला.

 

14 मार्च रोजी रात्री भद्र होम, 16 मार्चला सहाणवाडी वाडीपूजा, व 17 मार्चला सहाणभरणा अशा टप्प्याटप्प्याने उत्सवात धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक रंगही मिसळले. मुंबई मंडळातर्फे आयोजित नाट्यप्रयोगाने रसिकांची मने जिंकली.

 

पालखीने गावातील विविध घरांचे मानकरी घरभेटी कार्यक्रम 17 ते 19 मार्च दरम्यान पार पडले. त्यानंतर 20 मार्चपासून 30 मार्च 2025 पर्यंत विविध वाड्यांमध्ये पालखी घरोघरी फिरली.

उगवत वाडी, वरची वाडी, चौसोपी वाडी, सत्ये, बोंड, सहाण, वीरवाडी अशा वाड्यांमध्ये क्रमशः पालखीची प्रतिष्ठापना झाली.

 

30 मार्च गुढीपाडव्याला चौसोपी वाडीत प्रथेप्रमाणे शेष घरे घेऊन पालखी उत्सवाचा समारोप करण्यात आला. त्यानंतर देवीच्या शिंप न्याचा कार्यक्रम आणि रात्री पोस्ताचा सोहळा पार पडला.

 

उत्सवात सहभागी झालेल्या देवींची नावे – श्री सोमजाई देवी, वाघजाई देवी, मानाई देवी आणि चंडिकाई देवी – या देवतांच्या जयघोषाने अवघा परिसर भक्तिमय झाला.

 

#शिमगोत्सव2025 #पालखीउत्सव #पिंपरगाव #सोमजाईदेवी #रत्नागिरी #मराठीपरंपरा #गुढीपाडवा2025 #शिंपन्याचा_कार्यक्रम #वाडीतूनपालखी

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें