साखर उद्योगाच्या राज्य टास्क फोर्समध्ये अतुलनाना मानेपाटील यांची राज्य संचालकपदी निवड!

साखर उद्योगाच्या राज्य टास्क फोर्समध्ये अतुलनाना मानेपाटील यांची राज्य संचालकपदी निवड!

ऊस उत्पादकांच्या हितासाठी अभ्यासू नेतृत्वाला मिळाली मान्यता, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

बातमी मजकूर:
आहिल्यानगर (प्रतिनिधी: नंदकुमार बगाडे पाटील) – महाराष्ट्र राज्य साखर उद्योगासाठी कार्यरत शुगर टास्क फोर्सच्या राज्य कोअर कमिटीच्या संचालकपदी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे मार्गदर्शक आणि मानेपाटील इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष अतुलनाना मानेपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही निवड ऊस क्षेत्रात त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत करण्यात आली असून, यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अतुलनाना मानेपाटील हे ऊस उत्पादकांच्या समस्या समजून घेणारे, अभ्यासू व तळमळीचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना मानेपाटील म्हणाले, “ही संधी ऊस उत्पादकांच्या अडचणी केंद्रस्थानी ठेवून उपाययोजना राबवण्यासाठी वापरणार आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी टास्क फोर्समध्ये ठाम भूमिका घेणार आहे.”

#अतुलनानामानेपाटील #शुगरटास्कफोर्स #साखरउद्योग #ऊसउत्पादक #शेतकरीनेतृत्व #महाराष्ट्रअग्रक्रम #SugarcaneDevelopment #ShivKalyaAgriculture

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें