दिव्यांगांची गगनभरारी : विमानातून घेतला आनंद, गिरनारपर्यंत प्रवास

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिव्यांगांची गगनभरारी : विमानातून घेतला आनंद, गिरनारपर्यंत प्रवास

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ अतितीव्र दिव्यांग बांधवांचा दुर्गाशक्ती सामाजिक चळवळ व अशोक भुस्कुटे परिवारातर्फे विमान प्रवास सहल; राजकोट, गिरनार व सोमनाथचे दर्शन

“आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करायचा” हे स्वप्न अनेकांचे असते, पण अतितीव्र दिव्यांग बांधवांसाठी हे स्वप्न दूरचेच वाटते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दुर्गाशक्ती सामाजिक चळवळ व दिव्यांगमैत्र अशोक विठ्ठल भुस्कुटे यांनी पुढाकार घेत, ‘दिव्यांगांची गगनभरारी’ या उपक्रमांतर्गत विशेष विमान प्रवास सहल आयोजित केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, पाजपंढरी, भंडारपुळे अशा विविध भागांतील ९ दिव्यांग बांधवांनी या सहलीत सहभाग घेतला. तीव्र दिव्यांगत्वामुळे घराबाहेरही न पडणाऱ्यांसाठी हा प्रवास म्हणजे जीवनातील ऐतिहासिक क्षण ठरला. मुंबईहून राजकोटपर्यंतचा विमानप्रवास आणि त्यानंतर गिरनार पर्वतावर रोपवे सफर, सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन, गिर नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारी असा तीन दिवसांचा रोमांचकारी प्रवास दिव्यांग बांधवांनी अनुभवला.

या उपक्रमासाठी दिनेश पोतनीस (डोंबिवली) यांनी विमान तिकिटांचे प्रायोजकत्त्व स्वीकारले, तर चिपळूण नगरपालिका प्रशासकीय अधिकारी मंगेशजी पेढांबकर यांनी सहलीपूर्वी शुभेच्छा दिल्या. इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही दिव्यांगांना विशेष सहकार्य केले.

गुजरातमध्ये बसचालक संजय जानी यांनी स्वतःच्या खर्चाने दिव्यांगांना शितपेय व उसाचा रस पुरवला. त्यांनी रेल्वे स्थानकापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करून दिली. सहलीदरम्यान आरएचपी फाऊंडेशनचे अध्यक्ष सादीकभाई नाकाडे यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन करताना “घर सोडा, परिस्थितीत आनंद शोधा” असा संदेश दिला.

उपक्रमाच्या यशस्वीतामध्ये समिर करीम नाकाडे, लौकीक माधव सावंत, अमृता हमिद भुस्कुटे यांनी दिव्यांगांची काळजीपूर्वक वाहतूक केली. तसेच सारिका चिपळूणकर, अप्पा भोसले, दुर्गा, ओम व आरोही भुस्कुटे यांचेही सहकार्य लाभले.

हॅशटॅग्स:
#दिव्यांगांचीगगनभरारी #विमानप्रवास #दुर्गाशक्तीसंस्था #RatnagiriNews #InspiringJourney #DivyangSeva #SocialInitiative #ChiplunToRajkot

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा