मुंबईचा विजयी चौकार; रोहितचं पाठोपाठ दुसरं अर्धशतक; मुंबईची गुणतक्त्यामध्ये थेट तिसर्‍या स्थान‍वर झेप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईचा विजयी चौकार; रोहितचं पाठोपाठ दुसरं अर्धशतक; मुंबईची गुणतक्त्यामध्ये थेट तिसर्‍या स्थान‍वर झेप

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ट्रेंट बोल्टच्या घातक गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सने पराभव केला. हैदराबादने मुंबईला १४४ धावांचे लक्ष्य दिले होते, जे मुंबईने १६ षटकांत पूर्ण केले. या विजयासह, मुंबई गुणतक्त्यामध्ये सहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. १३ धावांवर असताना, रायन रिकेलटन ११ धावांची खेळी खेळून बाद झाला. विल जॅक्स देखील मोठी खेळी खेळू शकला नाही आणि २२ धावा करून बाद झाला. तथापि, त्याने रोहित शर्मासोबत ४६ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली. यानंतर रोहितने सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहित शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले.
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये आपला फॉर्म परत मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर त्याने हैदराबादविरुद्धही अर्धशतक पूर्ण केले. ९ वर्षांनंतर, रोहित शर्माने आयपीएलमध्ये सलग दोन अर्धशतके ठोकली. रोहित शर्माने शेवटचा असा पराक्रम २०१६ मध्ये केला होता. रोहित शर्मा ४६ चेंडूत ७० धावा काढून बाद झाला.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर, सनरायझर्स हैदराबाद त्यांच्या घरच्या मैदानावर हरवल्यासारखे दिसत होते. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज हेनरिक क्लासेनने संघासाठी ७१ धावांची शानदार खेळी केली. ४.१ षटकांत १३ धावांत चार विकेट गमावल्यानंतर, हेनरिक क्लासेन सनरायझर्सच्या मदतीला धावला आणि त्याने उपकर्णधार अभिनव मनोहर (४३) सोबत सहाव्या विकेटसाठी ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि हैदराबादला १४३ धावांपर्यंत पोहोचवले.
पॉवरप्लेमध्येच, ट्रॅव्हिस हेड (०), इशान किशन (१), अभिषेक शर्मा (८) आणि नितीश कुमार रेड्डी (२) हे फक्त १३ धावांवर बाद झाले. १२ वर्षांत पहिल्यांदाच हैदराबादने २० धावांच्या आत चार विकेट गमावल्या आहेत. यापूर्वी २०१३ मध्ये त्यांनी दोनदा २० धावांच्या आत चार विकेट गमावल्या होत्या. ट्रेंट बोल्टने चार तर दीपक चहरने दोन विकेट घेतल्या.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा