दळे ग्रामपंचायतीचे दप्तर चार दिवस उघड्यावर; दप्तर नष्ट होण्याची भीती

दळे ग्रामपंचायतीचे दप्तर चार दिवस उघड्यावर; दप्तर नष्ट होण्याची भीती

छप्पर कोसळल्यानंतरही दुरुस्ती नाही; ग्रामस्थांनी दप्तर BDO ताब्यात देण्याची केली मागणी

समिर शिरवडकर – रत्नागिरी

राजापूर (दळे) : राजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दळेच्या इमारतीचे छप्पर दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेला चार दिवस उलटूनही इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दप्तर आणि पत्रव्यवहार उघड्यावर असल्याने नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

या इमारतीच्या दुरुस्तीबाबत एक वर्षांपूर्वी ठराव मंजूर झाला होता, असे असूनही सरपंच महेश करगुटकर यांनी अद्याप कारवाई केली नाही, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ग्रामविकास अधिकारी यांनीही आपली जबाबदारी नाही, असे पत्र गटविकास अधिकारी (BDO) यांना दिल्याचे समजते, म्हणजेच स्थितीची जाणीव त्यांनाही होती.

 

ग्रामस्थांचा आरोप आहे की, ग्रामपंचायतीसाठी मिळालेला निधी मालकीच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठीच वापरायला हवा होता. पण आजतागायत काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात काहीच हालचाल झालेली नाही.

???? Youtube VDO ◀️ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ???? 

सध्या, इमारतीला बाहेरून कुलूप असले तरी छप्पर पूर्णपणे मोकळे असल्याने दप्तरांवर पावसाचे, वाऱ्याचे आणि अन्य संकटाचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संपूर्ण दप्तर तातडीने गटविकास अधिकारी कार्यालयात हलवण्याची मागणी केली आहे.

हॅशटॅग्स :

#दळेग्रामपंचायत #ग्रामपंचायतछप्परकोसळले #दप्तरउघड्यावर #राजापूरबातमी #रत्नागिरीवृत्त #ग्रामविकासअधिकारी #सरपंचमहेशकरगुटकर

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें