संगमेश्वर दौऱ्यात अजितदादांची पळापळ! मधमाशांचा अचानक हल्ला!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संगमेश्वर दौऱ्यात अजितदादांची पळापळ! मधमाशांचा अचानक हल्ला!

 

???? छत्रपती संभाजी महाराज स्मारक पाहणी दरम्यान घडली घटना

 

✍️ प्रतिनिधी | रत्नागिरी

आज रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ऐतिहासिक स्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी आले होते.

परंतु सरदेसाई वाड्यात पाहणी सुरू असताना अचानक मधमाशांनी अजितदादा पवारांवर हल्ला चढवला. यामुळे परिसरात घबराट पसरली आणि सर्वत्र एकच पळापळ झाली.

सुदैवाने, सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे अजितदादांना त्वरित बंद गाडीमध्ये सुरक्षितपणे हलवले गेले आणि मोठा अनर्थ टळला.

सध्या कोकणात अजितदादांच्या या पळापळीची जोरदार चर्चा सुरु आहे आणि ही घटना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 

 हॅशटॅग्स:

#अजितपवार #संगमेश्वर #रत्नागिरी #मधमाशांचाहल्ला #छत्रपतिसंभाजीमहाराज #कोकणबातम्या #सरदेसाईवाडा #मराठवाडा #महाराष्ट्रराजकारण

 

 

 

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...