तळवली हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के शंभर टक्के निकालाची पंरपरा कायम

तळवली हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के शंभर टक्के निकालाची पंरपरा कायम

तळवली (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली,ता.गुहागर जि.रत्नागिरी या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून सुयश प्राप्त विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

   महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या मध्ये कु. माही प्रकाश मयेकर हिने 95.60 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. कु. पायल पंढरीनाथ धामणस्कर हिने 90.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. समीरा उमेश जोशी हिने 89.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून येथील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावेळीही कायम राखली आहे.त्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी, तळवली गटविकास मंडळ व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी सुयश प्राप्त विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार सर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच तळवली सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या सुयशाबद्दल परिसरातूनही सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें